Skip to main content

Posts

*अक्षर मानव गायन व वादन स्पर्धा* प्रत्येक माणूस मोठं होत असताना कलागुण घेऊन विकसित होत असतो.शिक्षण म्हणजे माणसातला खरा गुणसंपन्न माणूस म्हणून उभं करण्याची व्यवस्था आपण तयार केलेली आहे.वाढत्या स्पर्धेच्या युगात बालवयात मुलांना बऱ्याच गुणांची आवड असते.करियर बनवणं.खाजगी शिकवणी सतत वाचन अभ्यास यात मुले गुरफटून गेलेली दिसत आहेत.      अशा धकाधकीच्या युगात मुलांना मुलं म्हणून योग्य ती संधी आणि शिक्षण देणाऱ्या संस्था नीट  काम करताना दिसतात.अशा पैकी एक माणसाची संघटना म्हणून काम करत असलेली अक्षर मानव संघटना आहे.या संघटनेच्या संगीत विभागाकडून मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.आपल्या परिसरातील मुलांनी वयोगट 8 वर्ष ते 18 वर्ष यातील मुलांनी संगीत गायन वादन स्पर्धेत भाग घ्यावा.यासाठी *मी अक्षर मानव आपणांस आवाहन करतो कि आपण आम्हाला एखादा हॉल उपलब्ध करून द्यावा अथवा तुमच्या संगीत विद्यालायमार्फत सयुंक्त विद्यमानाने अशी स्पर्धा आयोजित करता येईल.* आपण एकत्र यावं.ज्यांना असं करणे शक्य आहे त्यांनी बिंदास्त कॉल करा.बोलून सर्व ठरवू या. बोलण्यासाठी *9325042830* या क्रमांकावर फोन कर...
Recent posts

पूरग्रस्त मदत

*अक्षर मानवच्या माध्यमातुन पुरग्रस्तांना मदत.* गेला आठवडाभर अक्षर मानव संघटनेनं पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचं काम केलं. विविध ठिकाणी मदतीचं आवाहन करणं, आवश्यक साहित्याची यादी करणं, घरोघरी जाऊन मदत गोळा करणं, मिळालेल्या मदतीतुन वापरण्यायोग्य स्वच्छ सामान निवडणं, पुरेसं सामान प्रत्येक कुटुुंबात पोहचावं म्हणुन गरजेच्या वस्तुंच्या नीटनेटक्या किट्स, पॅकेज तयार करणं, योग्य ठिकाणी मदत पोहचवणं यासाठी आठवडाभर माणसं सातत्यानं राबली. पुरग्रस्त गावातल्या जबाबदार नागरीकांशी बैठकी, लोकांशी प्रत्यक्ष बोलुन त्यांना काय हवंय त्याचा रितसर अभ्यास, गरजु कुटुंबांची यादी करुन त्यांना मदत मिळवुन देणं. किमान चारपाच लाखांची मदत चारपाच दिवसात वस्तुस्वरुपात जमा झाली. माणसं माणसांसाठी एकञ आलीत तर माणसांच्या भल्याचं काम सहजपणे करु शकतात हाच अनुभव ह्या मदत संकलन उपक्रमात आला. अचानक आलेल्या पुरानं हैदोस घातला, लोकांची घरं अक्षरश: पाण्यात बुडाली, घरातल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तु, सगळा संसारच पाण्यात वाहुन गेला. आठवणीनं थरकाप उडवणारा एेंशी वर्षातला सगळ्यात भयंकर महापुर. ज्यांनी अनुभवला त्यांच्या वेदना कमी कर...

एक रविवार : एक चित्रकार

*|| अक्षर मानव, औरंगाबाद ||* *एक रविवार : एक चित्रकार* जन्माला येणारे प्रत्येक मुल हे चित्रकार असते. वयाच्या आठदहा वर्षापर्यंत ते जमेल तिथे रेघोट्या मारत राहते. पण पुढे प्रोत्साहन न मिळाल्यामुळे त्याच्या अंगातली चित्रकला हरवत जाते. शाळेमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण त्यातून मुलांमध्ये चित्रकलेची आस्था वाढतेच असे नाही. मुलांच्या अंगातली ही चित्रकला टिकून राहावी, तिला चालना मिळावी, चित्रकलेबद्दलची त्यांची समज वाढावी, मानवी जगण्यातल्या विविध क्षेत्रांमधला चित्रकलेचा व्यावसायिक उपयोग त्यांना कळावा या उद्देशाने 'अक्षर मानव' कडून "एक रविवार : एक चित्रकार" हा अभिनव उपक्रम योजला आहे. *उपक्रमाच्या अटी व नियम :* १) ९ - १५ या वयोगटातली मुले - मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात. २) यासाठी कसलेही प्रवेश मूल्य नाही. ३) प्रथम नोंदणी करणारया १०० मुलांना प्रवेश दिला जाईल. ४) प्रत्येक मुलाने कागद \ वही आणि चित्रकलेचे साहित्य स्वतःच घेऊन यावे. ५) उपक्रम एकूण ५ रविवार चालेल. प्रत्येक मुलाला पाचही रविवार उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ६) सुरुवातीचे ४ रविवारी महाराष्ट्रातले ४ मान्यवर...

अक्षर मानव रायगड आढावा

१. स्थापना : जानेवारी २०१८ २. एकूण आजीव सभासद : अठरा ३.होऊ घातलेले आजीव सभासद : दोन (माझ्याकडे सभासदत्व शुल्क जमा आहेत) ४. कार्यक्रम, गप्पा नि अड्डा : - ज्ञान संमेलन, पनवेल ( जानेवारी २०१८) - रंगकर्मी अशोक समेळ यांची मुलाखत ( एप्रिल २०१८) - कथा अभिवाचन, ( सप्टें २०१८) - संवाद ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, मोहोपाडा ( आॅक्टोंबर २०१८) -संवाद ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, पाताळगंगा ( डिसेंबर २०१८) हा एका दिवशी दोन ठिकाणी कार्यक्रम झाला होता. - कर्नाळा अभयारण्य सहल ( मार्च २०१९) - संगीत मैफल वेदांग धाराशीवे, पनवेल ( मे २०१९) - ग्रंथालय उद्घाटन सोहळा, रसायनी ( जून २०१९) - वृक्षारोपण ( जुलै २०१९) - पुस्तक प्रकाशन, पनवेल (जुलै २०१९) - परिसर मंच, मोहोपाडा आहे ( अॉगस्ट २०१९) - एकूण अड्डे : तीन ५. नियोजित कार्यक्रम - रायगड जिल्हा मेळावा, पनवेल (सप्टेंबर २०१९) - पथनाट्य स्पर्धा (अॉक्टो / नोव्हेंबर २०१९) - परिसर मंच, मोहोपाडा ( नोव्हेंबर २०१९) - कृषी संवाद ( डिसेंबर २०१९) -क्रिडा प्रशिक्षक संमेलन ( डिसेंबर २०१९)         रायगड जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिक,...

पटकथा कार्यशाळा

अक्षर मानव आयोजित || पटकथा कार्यशाळा || २४, २५ ऑगस्ट २०१९               रोज सकाळी १० पासून संध्याकाळी ६ पर्यंत. मार्गदर्शक : चंद्रकांत कुलकर्णी / कांचन नायक / आदित्य सरपोतदार / राज काझी स्थळ : मराठवाडा महाविद्यालय, पुणे प्रवेशफी : अक्षर मानव आजीव सदस्यांसाठी एक हजार रुपये / इतरांसाठी दोन हजार रुपये संपर्क : सतीश इंदापूरकर, इंदापूरकर भवन, सुरभी हॉटेलशेजारी, जंगली महाराज मंदिराजवळ, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे. फोन : 9623114393 / 9552516513 यावेळची कार्यशाळा मुद्दामच दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून ठेवलेली आहे. ◆ चंद्रकांत कुलकर्णी : वाडा चिरेबंदी (नाटक) गांधी विरुद्ध गांधी (नाटक) चाहूल (नाटक) येळकोट (नाटक) डॉक्टर, तुम्हीसुद्धा (नाटक) ध्यानीमनी चारचौघी (नाटक) बिनधास्त (चित्रपट) पिंपळपान (टीव्ही मालिका) भेट (चित्रपट) कायद्याचं बोला (चित्रपट) कदाचित (चित्रपट) मीराबाई नॉट आउट (हिंदी चित्रपट) मौनराग (नाटक) कॅरी ऑन पांडू (हिंदी चित्रपट) बस इतनासा ख्वाब है (हिंदी नाटक) हमीदाबाईची कोठी (नाटक) आधी बसू मग बोलू (नाटक) तुकाराम (चित्रप...

ज्ञानसंवाद

                                   आपण हा विषय वर्षभर बोलतो आहोत. अक्षर मानवमध्ये विविध विषयांची जाणकार मंडळी आहेत. त्यांची यादी करण्याचाही प्रयत्न होतो. मेघा मनोहर यांच्या निमित्तानं तो विषय पुन्हा पुढं आला. त्या आता राज्यभर मुलांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढीच्या कार्यशाळा घेत फिरतील. यातून आपण समाजाचा बौद्धिक विकासाचा जो प्रयत्न करतो आहोत त्याला आधार मिळेल. संवादानं ज्ञान वाढतं, यावर माझा विश्वास आहे. सोबत अक्षर मानवचा प्रचार प्रसारही होईल. तर आता हा प्रयोग आणखी वाढवू. आपले अक्षर मानवचे अनेक सभासद असे आहेत, जे आपापल्या कार्यक्षेत्राचे जाणकार आहेत. त्यांनी आपल्या ज्ञानाची भाषणं देत राज्यात फिरायला हवं. आपली कामं सांभाळून जसा वेळ मिळेल तसं ते फिरू शकतात. लोकांशी संवादाचे कार्यक्रम करू शकतात. आपले राज्यभर असलेले लोक त्यांना आपल्याकडं बोलवतील. तर अशा विविध क्षेत्रात जाणकार असलेल्या लोकांनी आपली सविस्तर माहिती मला द्यावी. नाव, ते बोलू शकतात तो विषय, त्यांचं गाव, फोन क्रमांक, इत्यादी. ...