Skip to main content
*अक्षर मानव गायन व वादन स्पर्धा*

प्रत्येक माणूस मोठं होत असताना कलागुण घेऊन विकसित होत असतो.शिक्षण म्हणजे माणसातला खरा गुणसंपन्न माणूस म्हणून उभं करण्याची व्यवस्था आपण तयार केलेली आहे.वाढत्या स्पर्धेच्या युगात बालवयात मुलांना बऱ्याच गुणांची आवड असते.करियर बनवणं.खाजगी शिकवणी सतत वाचन अभ्यास यात मुले गुरफटून गेलेली दिसत आहेत.
     अशा धकाधकीच्या युगात मुलांना मुलं म्हणून योग्य ती संधी आणि शिक्षण देणाऱ्या संस्था नीट  काम करताना दिसतात.अशा पैकी एक माणसाची संघटना म्हणून काम करत असलेली अक्षर मानव संघटना आहे.या संघटनेच्या संगीत विभागाकडून मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.आपल्या परिसरातील मुलांनी वयोगट 8 वर्ष ते 18 वर्ष यातील मुलांनी संगीत गायन वादन स्पर्धेत भाग घ्यावा.यासाठी *मी अक्षर मानव आपणांस आवाहन करतो कि आपण आम्हाला एखादा हॉल उपलब्ध करून द्यावा अथवा तुमच्या संगीत विद्यालायमार्फत सयुंक्त विद्यमानाने अशी स्पर्धा आयोजित करता येईल.* आपण एकत्र यावं.ज्यांना असं करणे शक्य आहे त्यांनी बिंदास्त कॉल करा.बोलून सर्व ठरवू या.
बोलण्यासाठी *9325042830* या क्रमांकावर फोन करा.

वेदांग धाराशीवे
राज्यप्रमुख
अक्षर मानव संगीत विभाग

Comments

Popular posts from this blog

पूरग्रस्त मदत

*अक्षर मानवच्या माध्यमातुन पुरग्रस्तांना मदत.* गेला आठवडाभर अक्षर मानव संघटनेनं पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचं काम केलं. विविध ठिकाणी मदतीचं आवाहन करणं, आवश्यक साहित्याची यादी करणं, घरोघरी जाऊन मदत गोळा करणं, मिळालेल्या मदतीतुन वापरण्यायोग्य स्वच्छ सामान निवडणं, पुरेसं सामान प्रत्येक कुटुुंबात पोहचावं म्हणुन गरजेच्या वस्तुंच्या नीटनेटक्या किट्स, पॅकेज तयार करणं, योग्य ठिकाणी मदत पोहचवणं यासाठी आठवडाभर माणसं सातत्यानं राबली. पुरग्रस्त गावातल्या जबाबदार नागरीकांशी बैठकी, लोकांशी प्रत्यक्ष बोलुन त्यांना काय हवंय त्याचा रितसर अभ्यास, गरजु कुटुंबांची यादी करुन त्यांना मदत मिळवुन देणं. किमान चारपाच लाखांची मदत चारपाच दिवसात वस्तुस्वरुपात जमा झाली. माणसं माणसांसाठी एकञ आलीत तर माणसांच्या भल्याचं काम सहजपणे करु शकतात हाच अनुभव ह्या मदत संकलन उपक्रमात आला. अचानक आलेल्या पुरानं हैदोस घातला, लोकांची घरं अक्षरश: पाण्यात बुडाली, घरातल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तु, सगळा संसारच पाण्यात वाहुन गेला. आठवणीनं थरकाप उडवणारा एेंशी वर्षातला सगळ्यात भयंकर महापुर. ज्यांनी अनुभवला त्यांच्या वेदना कमी कर...

पटकथा कार्यशाळा

अक्षर मानव आयोजित || पटकथा कार्यशाळा || २४, २५ ऑगस्ट २०१९               रोज सकाळी १० पासून संध्याकाळी ६ पर्यंत. मार्गदर्शक : चंद्रकांत कुलकर्णी / कांचन नायक / आदित्य सरपोतदार / राज काझी स्थळ : मराठवाडा महाविद्यालय, पुणे प्रवेशफी : अक्षर मानव आजीव सदस्यांसाठी एक हजार रुपये / इतरांसाठी दोन हजार रुपये संपर्क : सतीश इंदापूरकर, इंदापूरकर भवन, सुरभी हॉटेलशेजारी, जंगली महाराज मंदिराजवळ, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे. फोन : 9623114393 / 9552516513 यावेळची कार्यशाळा मुद्दामच दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून ठेवलेली आहे. ◆ चंद्रकांत कुलकर्णी : वाडा चिरेबंदी (नाटक) गांधी विरुद्ध गांधी (नाटक) चाहूल (नाटक) येळकोट (नाटक) डॉक्टर, तुम्हीसुद्धा (नाटक) ध्यानीमनी चारचौघी (नाटक) बिनधास्त (चित्रपट) पिंपळपान (टीव्ही मालिका) भेट (चित्रपट) कायद्याचं बोला (चित्रपट) कदाचित (चित्रपट) मीराबाई नॉट आउट (हिंदी चित्रपट) मौनराग (नाटक) कॅरी ऑन पांडू (हिंदी चित्रपट) बस इतनासा ख्वाब है (हिंदी नाटक) हमीदाबाईची कोठी (नाटक) आधी बसू मग बोलू (नाटक) तुकाराम (चित्रप...