आपण हा विषय वर्षभर बोलतो आहोत. अक्षर मानवमध्ये विविध विषयांची जाणकार मंडळी आहेत. त्यांची यादी करण्याचाही प्रयत्न होतो. मेघा मनोहर यांच्या निमित्तानं तो विषय पुन्हा पुढं आला. त्या आता राज्यभर मुलांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढीच्या कार्यशाळा घेत फिरतील. यातून आपण समाजाचा बौद्धिक विकासाचा जो प्रयत्न करतो आहोत त्याला आधार मिळेल. संवादानं ज्ञान वाढतं, यावर माझा विश्वास आहे. सोबत अक्षर मानवचा प्रचार प्रसारही होईल.
तर आता हा प्रयोग आणखी वाढवू.
आपले अक्षर मानवचे अनेक सभासद असे आहेत, जे आपापल्या कार्यक्षेत्राचे जाणकार आहेत. त्यांनी आपल्या ज्ञानाची भाषणं देत राज्यात फिरायला हवं. आपली कामं सांभाळून जसा वेळ मिळेल तसं ते फिरू शकतात. लोकांशी संवादाचे कार्यक्रम करू शकतात. आपले राज्यभर असलेले लोक त्यांना आपल्याकडं बोलवतील.
तर अशा विविध क्षेत्रात जाणकार असलेल्या लोकांनी आपली सविस्तर माहिती मला द्यावी. नाव, ते बोलू शकतात तो विषय, त्यांचं गाव, फोन क्रमांक, इत्यादी.
आपण त्यांची निवेदनं करून राज्यभर पोहोचवू. जिकडून मागणी येईल तिकडं त्यांनी जावं. ज्ञानाचं आदानप्रदान करावं.
या ग्रुपवर असलेल्या कोणत्याही विषयाच्या जाणकारांनी मला व्यक्तिगत वाट्सअपवर आपली माहिती पाठवावी. आपण निर्णय घेऊ.
राज्यभर संवादाची अखंड चालणारी मोहीम राबवू.
*ज्ञान संवाद सहभाग साठी खालील स्वरूपात माहिती पाठवा*
नाव-
ज्ञात कार्यक्षेत्र -
संपर्क क्रमांक -
व्याख्यान विषय -
माहिती पाठवण्यासाठी व्हाट्स ऍप क्रमांक (कॉल करू नये .मेसेज करा) राजन खान
95529 07898

मनःपूर्वक शुभेच्छा.
ReplyDelete